Untitled

मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा !

जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा

उपकाराची कुणा आठवण ?
'शिते तोवरी भूते' अशी म्हण
जगात भरले तोंडपूजेपण
धरी पाठिवर शरा !

आसक्त परि तू केलीस वणवण
दिलेस जीवन, हे नारायण
मनी न धरिले सानथोरपण
समदर्शी तू खरा !

Rate this poem: 

Reviews

No reviews yet.